कबनुर ;Marathi News Katta : पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील म्हणाले की चालू गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला प्रति टन 3300 रू. विनाकापत दर जाहीर केला आहे. हा दर आतापर्यंतचा राज्यातील इतिहासातील उच्चांकी दर आहे. चेअरमन पाटील म्हणाले की आम्ही यंदाही बाकीच्या कारखान्यांपेक्षा उच्चांक दर देत आहोत.
यंदा पाऊस कमी असल्याने उसाचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे साखरेचा भाव वाढण्याचे दाट शक्यता आहे. या कारणामुळेच प्रत्येक कारखाना रोज नवीन दर जाहीर करत आहे.
त्यामुळे चेअरमन पाटील यांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील संपूर्ण ऊस कारखान्याला देण्याचे आवाहन केले आहे.
इतिहासातील उच्चांक दर ऐकून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक देखील उपस्थित होते.
✌️✌️✌️
उत्तर द्याहटवा