बार्शीत मोठी घटना ;पत्नी आणि मुलाची हत्या करून शिक्षक पटीने घेतला गळफास ..!

Marathi News Katta
By -Marathi News Katta
0
Marathi News Katta बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडे प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा गळा कापून व आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः हे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने बार्शी तालुक्यात मोठे खळबळ उडाली आहे. अतुल सुमंत मुंडे (वय 40), तृप्ती अतुल मुंडे (वय 35) आणि ओम सुमंत मुंडे (वय 5) असे त्या मयत तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेले प्राथमिक माहिती अशी की, अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद येथे शिक्षक होते. तर तृप्ती मुंडे या बार्शीतील अभिनव शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते. खालच्या मजल्यावर अतुल मुंडे यांचे आई-वडील राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई- वडिलांनी मंगळवारी सकाळी वर जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले . पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे. या घटनेने बार्शी शहरात व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्या घटनेचे कारणाद्याप स्पष्ट झालेले नाही व पोलिसांच्या उघडकीस आलेली नाही. उपळाई रोडवरही नाईकवाडी प्लॉट येथे मोठी गर्दी झाली आहे. अधिकचा तपास बार्शी शहरातील पोलिस यंत्रणा करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)